CHAIRMAN'S DESK

ANNOUNCEMENTS WARANA is eminently, a unique name that stands as forerunner in the co-operative movement in India. The name WARANA sounds suitable wherever there is a mention of co-operative movement.

CHAIRMAN'S DESK

On Occasion Of 56th Annual General Meeting held in Warananagar Dated 30/09/2021

RESPECTED MEMBERS,

Nipunrao Vilasrao Kore

                सप्रेम नमस्कार..

                   सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनीं सहकारातून समृध्दींचे स्वप्न बपितले.तात्यासाहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण कल्पकतेवर त्यांच्या सहकार्यांनी विश्वास ठेवला आणि वारणा विंविध उद्योग आणि शिक्षण समुहाच्या माध्यमातून कृषी कौद्योगिक क्रांतीचा एक नवा अध्याय लिहिला गेला. याच अध्यावातील एक सुवर्णपाज ्् म्हणजेच आपली श्री वारणा सहकारी बँक.हिरक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या आपल्यवा बँकेचा /०३/२०२ अखेरचा वार्षिक अहवाल आपल्या समोर सादर करण्याच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधताना मला विशेष आनंद होत आहे.

                 खरे तर २०१९ च्या महापुरानं कोल्हापूर आणि सांगली या शहरांसह दोन्हीं जिल्ह्यांच्या ग्रामीण भागाचे मोठे नुकसान झाले.वा लुकसानीतून सावरण्या अगोदरच कोरोनाचे संकट अआले.संपलेले आर्थिक वर्ष कोरोनाचा सामना करण्यातच गेले. आाता संशोधकांच्या प्रवत्नांना यश वेऊन कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झालीं असलीं तरी आपल्याला अजूनही कोरोना विषाणूला रोखण्यासाठी नियमांचे पालन करत रहावे लागणार आहे.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू झालेल्या टाळेबंदीमुळे शेती, उद्योग-व्यवसाव यांच्या विकासात मोठी बाधा आणणारी ठरली. टाळेबंदी शिधिल होऊन अर्थचक्र पुन्हा फिरु लागले असतानाच २०२१चा जुलै महिना पुन्हा एकदा महापुराचे संकट घेऊन आला.या संकटामुळे महापूर- कोरोना आणि पुन्हा महापूर तसंच अजून ठाण मांडलेला कोरोना हे दुष्टचक्र कधी थांबणार असा प्रश् उपस्थित होत आहे.

               कोरोना सारख्या अपत्तीमुळे सर्वसामान्य गृहिणींच्या किंचन बजेट पासून बलाढ्य देशांच्या बजेट पर्यंत सर्वञ्र चिंतेचे वातावरण आहे.पण प्रत्येक आपत्ती ही काही नव्या संधी घेऊन वेत असते.त्याप्रमाणे कोरोजा संकटामुळे उद्योग- व्यवसायांचे स्वरुप बदलू पाहत आहे.वर्क फ्रॉम होम सारख्या संकल्पना खाता अधिक व्यापक होत आहेत.सगळेच उद्योग- व्यवसाव नव्या संधी शोधत असताना वारणा सहकारी बँक अशा संधींचे सोने करण्यासाठी शेतकरी,व्यापारी,उद्योजक यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिल याची ग्वाही मी देतो. आज आपल्या बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेले अनेक तरुण स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहिले अहेत.

             कोरोना आपत्तीचे इष्टापत्ती मध्ये रुपांतर करत बँकींग व्यवसायाचे स्वरुप सुध्दा बदलत आहे.याचाच भाग म्हणून आपल्या बँकेने सुध्दा डीजीटल बँकींग वर भर देत ग्राहकांना अत्वाधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बँकेची एटीएम, पॉईट ऑफ सेल सुविधा, कॉमर्स, मोबाईल बँकींग, आवएमपीएस, आरटीजीएस, एनर्डटफटीं दया सुविधा ग्राहकांच्या पसंतीला उतरल्या आहेत.डीजींटल बँकींग व्यवहारांची व्याप्ती वाढवण्याचा भाग म्हणून बँक वुपीआव खाधारित पेमेंट, डुंटरनेट बँकींग वा सुविधा देण्यासाठीं कटींबध्द आहे.

            केंद्र सरकारने नागरी सहकारी बँकां वरील आरबीआयचे निवंत्रण हे ग्राहकांच्या हिताचेच असेल.त्यामुळे वारणा सहकारी बँके सारख्या ग्राहकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या बँकेला हे नियंत्रण अडचणीचे वाटणार नाही.अर्थात नियंत्रणाच्या बरोबरीने रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकां प्रमाणेच बँकींग व्यवसावातील एक महत्त्वाचा घटक म्हणून नागरी सहकारी बँकांची सन्मानपूर्वक दखल वेणे सुध्दा तितकेच गरजेचे आहे.

          आपल्या बँकेच्या माध्यमातून सभासद,ठेवींदार,ग्राहक यांच्या साठी राबवल्या जाणाऱ्या कर्ज तसेच ठेव योजनांचे आपण नेहमींच स्वागत केले आहे. आपल्या विश्वास आणि पाठबळामुळे आम्हाला त्यामध्ये नवनवीन बदल करण्यासाठी प्रोत्साहन मिंळत असते.वापुढच्या काळात सुध्दा वारणा बँक प्रशासन सभासद,ठेवींदार आणिं ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी कटीबध्द राहिंल यात शंका नाही.निंयगिंत कर्जपरतफेड हा बँकींग व्यवसायाचा गाभा आहे.आपल्या बँकेच्या कर्जदारांनी निंवमिंत कर्जपरतफेड करुन नेहमीच सहकार्व केले आहे.हे सहकार्य यापुढे सुध्दा कावम राहिल ही मला खात्री आहे.

        बदलच शाश्वत आहे वा सूत्रावर विश्वास ठेवून वारणा सहकारी बँक काळानुरुप आपल्या कार्वपध्दतीं मध्ये बदल करत आहे. पण स्वर्गीय तात्यासाहेबांनी घालून दिलेल्या ञादर्शां पासून तसूभर सुध्दा ढळता सहकाराचे सर्वसामान्यांच्या उध्दाराचे साध्य गाठण्यासाठी बँकेचे पदाधिकारी,संचालक आणि प्रशासन बांधिल आहे. कोरोना,महापूर यांसारख्या आपत्तींचा धींरोदात्तपणे सामना करत पुन्हा नव्याने समाजाला उभारी देण्याची ताकद सहकार क्षेत्रा मध्येच आहे.हेच सहकार तत्व जपत अपल्या आकांक्षांच्या क्षितिजाला अर्थ देण्यासाठी वारणा सहकारी बँक सदैव आपल्या सोबत आहे..

 धन्यवाद !

                                            जय सहकार !

                                                                                                                                                                                                                                                                                आपला

                                                                                                                     निपुणराव विलासराव कोरे

                                                                                                                                                                                                                                 चेअरमन